रेडियंटचे घवघवीत यश : २२ विद्यार्थांना ९० टक्क्याहून अधिक गुण
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : येळवडे -कोदवडे (ता.राधानगरी) येथील रेडियंट स्कूल आणि एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. या स्कूलच्या ३४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २२ विद्यार्थी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले तर बारा विद्यार्थी ८४ टक्क्याहून अधिक गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. तनिष्का रविंद्र पाटील हीने ९७. ६० टक्के गुण प्राप्त केले. त्या पाठोपाठ सोनल प्रकाश पाटील हिने ९७% तर प्रतिराज सुनील पाटील याने ९६. ४०% इतके गुण मिळवले.
मोजके विद्यार्थी आणि उच्च गुणवत्ता हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. त्याला अनुसरून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. एका वर्गात केवळ जेमतेम विद्यार्थी आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देणे ही या संस्थेची खासियत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये ३८ पैकी तब्बल २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. जी. पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.