
महाआरतीसाठी रविवारी गौतमी पाटील सावकार गणपती चरणी
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील राशिवडे ता. राधानगरी येथे सावकार गणपतीच्या महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहे. सकाळी १० वाजता महाआरती सुरू होईल अशी माहीती नामानंद चौक सावकार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शेखर धुंदरे, उपाध्यक्ष प्रशांत भोपळे यांनी दिली.
मागील वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव गौतमी पाटीलवर प्रशासनाने बंदी घातली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षांनंतर गौतमी पाटील पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात येत आहे.