
भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांच्या गुडाळ येथील तर ए.वाय. यांच्या सोळांकुर येथील घरावर कैफियत मोर्चा
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : जयसिंगराव संघटनेने भल्या भल्यांचा माज उतरवलाय, तुम्ही फार छोटे आहात. शिक्षण संस्था घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या विरोधात एक होऊन कैफियत मांडायला तुमच्या दारात येत आहोत. माझ्यावर केलेल्या आरोपांची उत्तरे दारात येवून देतो. भोगावतीला वेगळ्या उंचीला नेलेल्या गोपाळराव हुजरे यांच्या दारात दाद मागणार सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ सुकाणु समितीचे अध्यक्ष व स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
कार्यकाळ संपून दोन वर्षे झाली तरीही अध्यक्ष जयसिंगराव हुजरे व संचालक मंडळांने राजीनामा देण्याचा शब्द पाळलेला नाही. म्हणूनच त्यांचे नेते ए. वाय. पाटील यांच्या दारात जायचे आहे. माझ्यावर केलेले आरोप आणि त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीत केलेली वक्तव्य याचा हिशेब त्याच दिवशी मी गुडाळवाडी येथे मांडणार आहे. भोगावती कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ बत्तीस हजार सभासदांच्या मालकीचे करायचे यासाठी कैफियत आंदोलन काढणार आहोत. यासाठी हात वर करून हजारो सभासदांनी पाठिंबा दिला आहे. त्या सर्व सभासदांनी ठीक बारा वाजता गुडाळ येथे उपस्थित रहावे. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, भीमराव गोनुगडे, अण्णाप्पा चौगले, रमाकांत तोडकर आदी उपस्थित होते.