
घटना दुरुस्ती नाहीच : आम्ही निवडून आलो आहोत सात वर्षे कारभार : निवडणूक स्थगितीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळासाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सरळ लढत होत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यापेक्षा शिक्षण मंडळावर वर्चस्व कोणाचे यातच घोडे अडल्याने आज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक होणार हे सिद्ध झाले. आज सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीने पॅनल जाहीर केले. तर महायुतीने दुपारी तीन वाजता उमेदवार जाहीर केले.
इच्छुकांची मांदियाळी, गटाचे वर्चस्व राखण्यासाठी बहूमताची बेरीज आणि कार्यकर्त्यांना दिलेला शब्द यामुळे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक लागली. शिक्षण मंदिरात राजकारण नको म्हणत सर्वच राजकीय गट निवडणूकीला सामोरे जात आहेत.
मागील संचालक मंडळात सर्व पक्षीय संचालक होते. शिक्षण प्रसारक मंडळाची घटना दुरुस्ती करण्यासाठी हे संचालक मंडळ निवडून दिले होते. घटना दुरुस्ती झाली नाहीच तर आम्ही निवडून आलो आहोत पाच वर्षे कारभार करतो त्यानंतर घटनादुरुस्ती करु असे सांगत सात वर्षे कारभार केला. आणि शेवटी निवडणूकीला स्थगिती मिळवण्यासाठी शेवटपर्यंत केविलवाणे प्रयत्न केले.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे राहुल पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार – पाटील यांच्या सह गोकुळचे अरुण डोंगळे, भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले नेतृत्व करत आहेत.
महायुतीने स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे नेतृत्व भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर, गोकुळचे संचालक कीसन चौगले, भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, रविश पाटील, प्रा. डॉ. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, दत्तात्रय मेडसिंगे करत आहेत.
महाविकास आघाडी
राजेंद्र आडके आरे, दिगंबर मेडसिंगे कांडगाव, एकनाथ वरुटे म्हालसवडे, रोहित पाटील कुरुकली, सुभाष पाटील सिरसे, बाजीराव चौगले आमजाई व्हरवडे, अभिषेक डोंगळे घोटवडे, शिवाजी भाट येळवडे, राजाराम पाटील खिंडी व्हरवडे, बाजीराव चौगले कुडुत्री,समरजितसिंह पवार -पाटील सडोली, प्रमोद पाटील म्हाळुंगे, मोहन पाटील अणाजे यांना उमेदवारी दिली आहे.
महायुती कै दादासाहेब पाटील कौलवकर आघाडी
धैर्यशील पाटील कौलवकर, धनाजी पाटील कोदवडे, राजश्री पाटील देवाळे, स्वरूप सिंह पवार- पाटील सडोली, शहाजी कवडे आवळी बुद्रुक, विश्वास पाटील ठिकपुर्ली, संजयसिंह कलिकते शिरगाव, अजित पाटील हसुर दुमाला, जालंदर पाटील राशिवडे, निवास पाटील हळदी, नामदेव पाटील कुरुकली, बाजीराव लांबोरे बेले, अरुण पाटील कसबा तारळे यांची उमेदवारी जाहीर केली.