
भोगावती शिक्षण मंडळासाठी चुरशीने मतदान : सोमवारी मतमोजणी
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातून उत्स्फूर्त मतदान झाले. मतदानाची वेळ पाच वाजेपर्यंत असली तरी उशिरापर्यंत केंद्रांवर मतदान सुरूच होते. उद्या सोमवारी मतमोजणी साठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
भोगावती साखर कारखान्याचे सर्व सभासद या शिक्षण मंडळाला मतदार असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात मोठी ही निवडणूक ठरणार आहे. एकूण अठ्ठावीस हजार ९५६ मतदारांपैकी बहुतांश मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला भोगावती कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीच्या नव्या सभागृहामध्ये सुरुवात होणार आहे. एकूण १६ टेबलवर ३१ केंद्रांची मतमोजणी सुरू होईल. साधारणतः दुपारी तीन ते चार पर्यंत निकाल देऊ असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भोईंभर दिला आहे.