हीप हॉफर्स ग्रुप
पुणे प्रोपेल सिरीजची पिंन्टो साउंड
साई लाईट्स बिरदेवच्या २०२४ विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरणार
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : मागील पाच दिवसापासून अबालवृद्धांना भक्तीत तल्लीन केलेल्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीस बिरदेव तरुण मंडळ सज्ज झाले आहे. याहीवर्षी something new & big ही संकल्पना घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत आहे. हीप हॉफर्स ग्रुप, आकर्षक रोषणाई आणि पुणे येथील साऊंड सिस्टीम यावर्षीचे खास आकर्षण आहे.
मिरवणूकीची तयारी पुर्ण झाली असुन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मिरवणूकीला सुरवात होईल अशी माहिती अध्यक्ष पंकज पाटील व उपाध्यक्ष संदीप पोवार यांनी दिली.
वेगळेपणात सातत्य असल्याने बिरदेव तरुण मंडळाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत प्रथमच स्पेशल लाईट इफेक्ट्स सह सहभागी होत आसमंत उजळून टाकला होता. तीच परंपरा कायम ठेवत याहीवर्षी मुंबई येथील हीप हॉपर्स डान्स ग्रुपला आमंत्रित केले आहे. सोबत पुणे येथील पुणे प्रोपेल सिरीजची पिंन्टो साउंड सोबत डीजे सेव्हन अॉफीसिएल, कोल्हापूरची साई लाईट्स खास आकर्षण असणार आहेत.