व्यापारी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी वनिता सुतार, उपाध्यक्षपदी ज्योती आजमणे बिनविरोध
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : येथील राशिवडे व्यापारी महिला मंडळाची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सुप्रिया तवटे होत्या. सचिव अदिती मगदूम यांनी स्वागत केले.
सभेत नुतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. व्यापारी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी वनिता दिलीप सुतार व उपाध्यक्षपदी ज्योती विजय आजमणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शालन पाटील, कुसुम कोरे, शशिकला निल्ले, रूपाली लोखंडे, सुरेखा नकाते, स्वाती पाटील, उत्कर्षा काटकर, मीना कानकेकर, लीला बिल्ले, रंजना कुंभार, सारीका वर्णे यांच्यासह अर्थ समिती सदस्य लीलावती निल्ले, सुमती लोखंडे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. मीना कानकेकर यांनी आभार मानले.