अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
राशिवडे येथे वृक्षारोपण व वह्यांचे वाटप
सुपर न्यूज नेटवर्क
राशिवडे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील जनविश्वास सप्ताह अंतर्गत राशिवडे येथे वृक्षारोपण व वह्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांच्यावतीने नागेश्वर हायस्कूल राशिवडे येथे शनिवारी राधानगरी तालुक्यातील हा कार्यक्रम घेण्यात आला.
यानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, राधानगरी तालुकाध्यक्ष व गोकुळचे संचालक प्रा किसनराव चौगले, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष भिकाजी एकल, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष शरद पाटील व बिद्रीचे संचालक फिरोजखान पाटील आदींच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील होते.
स्वागत व प्रास्ताविक भाषणात माजी जि प सदस्य विनय पाटील यांनी राशिवडे जिल्हा परिषद मतदार संघातील ६५ शाळांमध्ये प्रत्येकी ६५ वह्या व एकूण ६५० झाडे वाटप करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.आहे.त्यानंतर प्रमुख पाहुणे बाबासाहेब पाटील,अनिलराव साळोखे,शरद पाटील,फिरोजखान पाटील व संजयसिंह कलिकते यांचा अनुक्रमे विनय पाटील, सुभाष पाटील, किसनराव चौगले, शिवाजी लाड व दिलीप लाड यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा किसनराव चौगले यांनी राज्यभर व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले असल्याचे सांगितले. तर अनिलराव साळोखे यांनी यानिमित्ताने सरकारी निर्णय व विकास कामांची माहिती देत आहोत असे सांगून प्रत्येक शाळेत संविधान प्रत भेट देऊन संविधान वाचन करीत आहोत. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी विविध योजनांचा प्रचार व प्रसार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जळनमाणसापर्यंत पोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी राजेंद्रदादा पाटील, बाजीराव पाटील, दिलीप पाटील, सरपंच राजेंद्र पाटील म्हासुर्ली, धनाजीराव पाटील, संतुआण्णा पाटील, तानाजी पाटील, शहाजी भाट आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सुत्रसंचालन वाय एम पाटील यांनी केले.पर्यवेक्षक दत्तात्रय टिपूगडे यांनी आभार मानले.