राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प : फोंडा घाटात पेट्रोलचा टँकर कड्यावरून खाली कोसळला
सुपर न्युज नेटवर्क
राधानगरी : कोल्हापूर – राधानगरी -गोवा राज्य मार्गावर फोंडा घाटाच्या सुरुवातीलाच पेट्रोलचा टँकर कड्यावरून खाली कोसळून राज्य मार्गावरच पेट घेतली. यामध्ये चालक ठार झाला तर हजारो रुपयांचे नुकसान झाले.
बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दाजीपूर येथून काही अंतरावर खिंडीतून पुढे गेल्यानंतर सिंधुदुर्गची हद्द सुरू होते. या हद्दीमध्ये प्रवेश करतात चालकाचा ताबा सुटल्याने डावीकडे टँकर कड्यावरून खाली कोसळला आणि वळणावरून आलेल्या रस्त्यावर जाऊन पेटला. यामुळे राज्यमार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. आगीवर नियंत्रण करण्यासाठी कणकवली आणि फोंड्यातून अग्निशामक दल बोलवण्यात आले आहे.