छत्रपतींबद्दल कृतज्ञता, आपुलकी, मान ठेवत नव्वद वर्षीय गुरुजींचा स्वखर्चाने प्रचार.
सुपर न्युज नेटवर्क
राधानगरी : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्याबद्दल असलेले प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा असलेल्या गडहिंग्लजच्या रणदिवे गुरुजींनी स्वखर्चाने छत्रपती शाहु महाराजांचा प्रचार सुरु केला आहे. त्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
नव्वद वर्षीय रणदिवे गुरुजी स्वखर्चाने महाआघाडीचे उमेदवार छत्रपती शाहु महाराजांचा एस. टी. ने फिरत घरोघरी जात प्रचार करत आहेत. गुरुजींच्या आपुलकीने छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत, छत्रपती घराण्याचे जिल्ह्यावर असणारे उपकार विसरता येणार नाहीत असे भावनिक मत व्यक्त केले. त्यानंतर रणदिवे गुरुजी छत्रपती शाहुंच्या प्रचारासाठी पुढील दौऱ्यावर निघुन गेले. छत्रपती घराण्याबद्दल असणाऱ्या आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नव्वद वर्षीय रणदिवे गुरुजी जिल्ह्यातील युवकांना नवी उमेद देत आहेत.