‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’
सुपर न्युज नेटवर्क
कोल्हापूर : मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे निलेश साबळे मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. निलेश साबळेसोबतच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
टीव्हीवर सलग दहा वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याच्या काही दिवस आधीच डॉ. निलेश साबळेने हा शो सोडला होता. ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्याने असंख्य प्रेक्षकांची नाराजी झाली होती. या कार्यक्रमाला निलेश साबळेच्याच एका प्रसिद्ध वाक्यावरून नाव देण्यात आलं आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, असं या कार्यक्रमाचं नाव आहे.
आता नवीन रुपात आणि नवीन कलाकारांच्या टीम सोबत डॉक्टर निलेश साबळे पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम घेऊन हजर होत आहेत.