आरोग्य सेवेसह आता जनसेवेच्याही रणांगणात : डॉ. नवज्योतसिंह देसाई
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : सामाजिक भान आणि कर्तव्याची जाण असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मी उद्याच्या राधानगरी विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. युवकांसोबतच इथल्या जनतेचे प्रेम पाठीशी राहू दे असे आवाहन डॉ. नवज्योतसिंह देसाई यांनी व्यक्त केले. ते आज राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे युवा संवाद मेळाव्यात बोलत होते.
संभाव्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता. मोठ्या संख्येने युवक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. नवज्योतसिंह देसाई म्हणाले, “आजवर सीपीआर च्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी पात्र ठरलो. आता यापुढे प्रत्यक्ष जनसेवा करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, शेती आणि बेरोजगारी याचा अजेंडा घेऊन मी विधानसभेला सामोरे जात आहे. लोकांनी मला आशीर्वाद आणि पाठबळ द्यावे. यावेळी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मधुकर कीरुळकर, उदय भोसले, सुनील शेळके कोणोली, रामचंद्र देवणे म्हासुर्ली, अक्षय देसाई, युवराज पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सतीश ढोकरे, आनंदा जोंग, दिलीप कुपले, बळवंत बुगडे, गंगाराम पाटील, पांडुरंग पोवार, अशोक मगदूम, सात्ताप्पा कुडीत्रेकर आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.