शेकापक्षाचा छत्रपती शाहु महाराजांना पाठींबा : सडोलीतील मेळाव्यात घोषणा.
सुपर न्युज नेटवर्क
सडोली खालसा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाने कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा देऊन बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार भाई संपतराव पवार-पाटील (सडोलीकर) यांनी सडोली खालसा (ता. करवीर) येथे या मेळाव्याचे आयोजन केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मा. आ. मालोजीराजे छत्रपती, विजय देवणे, संजय पवार, क्रांतिसिंह पवार -पाटील, भोगावतीचे संचालक केरबा पाटील, सरदार पाटील, अक्षय पवार-पाटील, व्ही. बी. पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, बाबासो देवकर आदी उपस्थित होते.