पालकमंत्री मुश्रीफ, मंडलीकांना धक्का : ए.वाय. पाटील यांचा शाहु छत्रपती यांना जाहीर पाठींबा.
सुपर न्युज नेटवर्क
सोळांकुर : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी महारॅली काढत आपल्या कार्यकर्त्यांसह शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. हा निर्णय मंडलीकासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का मानला जात आहे.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलीक यांना पाठिंबा देण्यासाठी ए. वाय. पाटील यांची मनधरणी केली जात होती. ए. वाय. कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
आज पाचशेहुन अधिक चारचाकी वाहनांतून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांसह शाहु छत्रपती यांना पाठिंबा देत विजयांच्या घोषणा दिल्या. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार , गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळ चे संचालक बाळासाहेब खाडे, भारत पाटील-भूयेकर, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र कवडे, बी. एस. पाटील-अकनूरकर, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, ए. वाय. पाटील प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.