
माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे शुभ हस्ते, खासदार छत्रपती शाहु महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, राहुल पाटील (सडोलीकर) यांची उपस्थितीत
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : गोकुळचे माजी संचालक व भोगावतीचे माजी उपाध्यक्ष पी. डी. धुंदरे या़ंचा अमृतमहोत्सवी सोहळा माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे शुभ हस्ते खासदार छत्रपती शाहु महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, राहुल पाटील (सडोलीकर) यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१ मार्च रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. अशी माहीती गौरव समितीचे अध्यक्ष भोगावतीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजु कवडे, हिंदुराव चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पन्नास वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पी. डी. धुंदरे यांनी काॅंग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे राहुन पक्ष एकजुटीसाठी प्रयत्न केले. स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहुन पक्ष वाढीचे काम केले. राशिवडेचे सरपंच ते गोकुळचे संचालक अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहीली. सहकारी तत्त्वावर विविध संस्था स्थापन केल्या. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ७५ वर्ष पुर्ण केलेल्या वयोवृध्दांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग देसाई, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे माजी अध्यक्ष अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, राजेश पाटील सडोलीकर, अभिजित तायशेटे यांचेसह राधानगरी, भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला सदाशिवराव चरापले, ए.डी.चौगले, विश्वनाथ पाटील, ए.डी.पाटील, राशिवडेचे माजी सरपंच बी.एन.गोंगाणे, प्रकाशराव चौगले आदी मान्यवर उपस्थित होते.