रेडियंट स्कूल अँड एज्यू कॉम्प्लेक्स : योग्य दिशा आणि ध्येय निश्चिती केल्यास यश मिळतेच : पोलीस निरीक्षक अमर पाटील
सुपर न्युज नेटवर्क
राधानगरी : विद्यार्थी दशेतच भविष्यातील लक्ष्य निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. मोठी स्वप्ने केवळ पाहण्यात मजा नाही तर ती पूर्ण करण्यात फार मोठा आनंद आहे. असे प्रतिपादन जुहू (मुंबई) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी केले. ते रेडियंट स्कूल अँड एज्यू कॉम्प्लेक्स कोदवडे (ता. राधानारी) मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे निरीक्षक बाळासाहेब पाटील होते.
अमर पाटील म्हणाले, शिक्षण दर्जेदार मिळणे हे एक भाग्य असते. योग्य दिशा पकडून आणि ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. अलीकडे ग्रामीण भागातील शिक्षणाच्या कक्षा रुंदावत आहेत हे प्रगतीचे लक्षण आहे. आम्ही प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढला. नव्या पिढीला आज वाटा सुकर आहेत मात्र संधीचे सोने केले पाहिजे. त्यांचे स्वागत स्कूलचे मुख्याध्यापक संस्थापक आर. जी. पाटील, अध्यापक राम पाटील यांनी केले. याप्रसंगी वीरेंद्र पाटील, के डी पाटील, राजेंद्र पाटील, सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित सरवळकर यांनी केले. आभार संगीता आंब्रे यांनी मानले.