संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची उपस्थिती
सुपर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिल रोजी कोल्हापुरात येत आहेत. शनिवारी तपोवन मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तपोवन मैदानावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही सभा होत आहे. या सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.