
रेडियंट : नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण आणि व्यवसायाभिमुख शिक्षणासह नव नवीन दालने खुली करून देणारी शिक्षण संस्था : अर्जुन आबिटकर
सुपर न्यूज नेटवर्क
राशिवडे : रेडिएंट स्कूल दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकासावर आधारित मार्गदर्शनातून आदर्शवत नवी पिढी घडवत आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले. ते येळवडे (ता. राधानगरी) येथे रेडिएंट स्कूल आणि एज्यु काँप्लेक्सच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजेंद्र पाटील होते.
श्रीमान छत्रपती कला क्रीडा अकादमी संचलीत रेडियंट स्कूलच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी दहावी, एन. एम.एम.एस. आणि क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अर्जुन आबिटकर, भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील, भोगावतीचे सचिव उदय मोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
अर्जुन आबिटकर म्हणाले, ” नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण आणि व्यवसायाभिमुख शिक्षणासह नव नवीन दालने खुली करून देणाऱ्या शिक्षण संस्था टिकतील. प्रायोगिक शिक्षणाबरोबरच जीवनमान उंचावण्याचे आणि संस्कार शिक्षण देण्याचे धडे द्यावे लागतील आणि हे रेडियंट संकुलामध्ये घडत असल्याने उच्च प्रतीच्या विद्यार्थ्यांची जडणघडण येथे होत आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर. जी. पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात सलग मिळवलेले क्रमांक आणि शैक्षणिक शैक्षणिक संस्थेची वाटचाल याबाबत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादरीकरण केले. याप्रसंगी कुरुकलीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील, विजयराव भोसले, आनंदा शिंदे, संग्राम पाटील गुडाळकर, संस्थेचे संचालक जिवन पोवार, सचिन पाटील, विनोद घरपणकर, वीरेंद्र पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता आंब्रे यांनी केले. सचिव राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.