राशिवडे व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बंडोपंत कुंभार, उपाध्यक्षपदी सर्जेराव आजमणे
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : राशिवडे व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बंडोपंत कुंभार व उपाध्यक्षपदी सर्जेराव आजमणे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष राजेंद्र निचिते होते.
राशिवडे व्यापारी असोसिएशनची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
२०२४ ते २७ या तीन वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली. नूतन संचालक पदी समाधान परीट, संदिप गोंगाणे, अमर मगदूम, किरण वणकुद्रे, राजाराम तवटे, सुर्यकांत ताडे, संदीप जाधव, बळवंत लाड, पांडुरंग भोकरे, धिरज धुंदरे यांची निवड करण्यात आली.
व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष एकनाथ चौगले, बळीराम गोनुगडे, चंद्रकांत नकाते, गजानन बिल्ले, सुधाकर कानकेकर, यांच्यासह राशिवडे व्यापारी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ निल्ले, उपाध्यक्ष दिलीप सुतार, संचालक विश्वनाथ कोरे, विवेक पोतदार, संजय नकाते, दिलीप नकाते गणपती चौगले, शरद पोतदार, पंकज पाटील, अशोक शिंदे, अशोक जंगम, सर्जेराव कोथळकर सर्व संचालक व्यापारी असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक सचिव अभय नकाते यांनी केले. मावळते उपाध्यक्ष सुरेश आजमणे यांनी आभार मानले.