
महाराष्ट्र केसरी उपविजेते प्रकाश बनकर व माऊली कोकाटे यांची मुख्य लढत : मैदानात एकशे साठ कुस्त्या
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : येथील ग्रामदैवत बिरदेव यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता नागेश्वर हायस्कुलच्या मैदानात महाराष्ट्र केसरी उपविजेते प्रकाश बनकर व माऊली कोकाटे यांची मुख्य लढत होत आहे अशी माहिती हनुमान कुस्ती संकुलचे वस्ताद सागर चौगले, संदीप डकरे यांनी दिली.
या मल्लयुध्दासाठी पालकमंत्री प्रकाश आबीटकर, खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर), गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी आमदार के. पी. पाटील, राहुल देसाई, गोकुळ चे माजी संचालक पी.डी.धुंदरे यांचेसह गोकुळ चे संचालक, भोगावतीचे संचालक, जि.प. पं.स.चे पदाधिकारी, विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रथम क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर व माऊली कोकाटे(पुणे), द्वितीय क्रमांकासाठी कालीचरण(गंगावेश) व पवनकुमार(हरियाणा), तृतीय क्रमांकासाठी श्रीमंत भोसले (व्यकोबा मैदान) व हनुमंतपुरी (पुणे), चतुर्थ क्रमांकासाठी सुशांत तांबुळकर (सेना दल) व शशिकांत बोगार्डे यांच्यामध्ये मल्लयुध्द होणार आहे. यासह प्रतिक म्हेतर वि. सुनिल करवते,सौरभ पाटील वि.संग्राम जमदाडे,ओंकार लाड वि.राहुल पाटील या नामवंत मल्ल्लाचे मल्लयुध्द रंगणार आहे.या प्रमुख कुस्त्यासह चटकदार १६०कुस्त्या संपन्न होणार आहेत. कुस्तीशौकीनासाठी गॅलरीसह खास बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.तर प्रकाशझोताचीही व्यवस्था करण्यात आली आहे.