
राशिवडेत सदगुरू बाळूमामा विशाल भंडारा उत्सवाला येथे प्रारंभ : सोमवारी मिरवणूक व महाप्रसादाने सांगता
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : राशिवडे (ता राधानगरी) येथील श्रीसंत सदगुरु बाळूमामा भक्त मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या बाळूमामा भंडारा उत्सवाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील परिसरात शनिवार पासून प्रारंभ झाला. यानिमित सोमवारी दि २७ रोजी सकाळी ९ वा बाळूमामा मुर्ती मिरवणूक व सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अशी माहिती अध्यक्ष महादेव धुंदरे व उपाध्यक्ष कॄष्णात घाटगे यांनी दिली.
भंडारा उत्सवात शनिवारी पहाटे पाच वाजता विनापूजन राधानगरीचे माजी उपसभापती रविश पाटील कौलवकर व मूर्तीपूजन छत्रपती शाहू सहकार समुहाचे अध्यक्ष संजय डकरे यांच्या हस्ते झाले. बाळूमामा मालिका फेम विक्रम जगताप (मेजर वासुरेकर) यांचा ब्रम्हांडनायक बाळूमामा यांच्या जीवन चरित्रावर आधारित कथासार किर्तनाचा कार्यक्रम रात्री झाला. तर सोमवारी दि.२७ रोजी सकाळी ९ वा बाळुमामांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा शुभारंभ सरपंच संजिवनी पाटील व उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये सर्व भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव कमिटीने केले आहे.
सोमवारी सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ताराराणी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी प्रकाश आबिटकर व बुरंबाळी आश्रमाचे गगनगिरी महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले (सरकार) उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता शाहिर सत्यवान गावडे येललूरकर यांचा आधुनिक पध्दतीच्या ओव्यांचा कार्यक्रम होईल. तरी या सर्व कार्यक्रमात राशिवडे पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन अध्यक्ष महादेव धुंदरे,उपाध्यक्ष कृष्णात घाटगे यांच्यासह कार्याध्यक्ष दिनकर शिंदे (सरकार) व दत्तात्रय उर्फ हरी पाटील आणि सर्व सदस्यांनी केले आहे