केरबा भाऊ पाटील यांनी चौदा वर्ष तर ए. डी. चौगले यांनी नऊ वर्ष सत्ता उपभोगली त्यावेळी त्यांच्या घरावर किती वेळा मोर्चा काढला?
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : भोगावती शिक्षण संस्थेवर खोडसाळ, बिनबुडाचे आरोप करत आहेत. खोटी माहिती सांगुन सभासदांची दिशाभूल व शिक्षण मंडळाची बदनामी सुरू आहे. नोकरीवर असताना कित्येक महीणे काम न करता लाखो रुपये मासिक पगार घेतला. शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान केले. अशा प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी नैतिक भान ठेवून शिक्षण मंडळावर आरोप करावेत. संचालक मंडळाची व आमच्या नेतेमंडळींची बदनामी खपवून घेणार नाही असा सज्जड दम भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
बोगस संचालक मंडळ रद्द करुन शिक्षण मंडळ सभासदांच्या मालकीचे करा अन्यथा येत्या रविवारी अध्यक्ष जयसिंगराव हुजरे व त्यांचे नेते ए. वाय. पाटील यांच्या घरासमोर सभासदांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी दिला होता त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद घेवून संचालक मंडळाने भुमिका स्पष्ट केली.
सुकाणू समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील सभासदांची दिशाभूल करत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधातील न्यायालयीन वाद याचिकाकर्त्यांनी मागे घेतलेले नाहीत. दावे मागे घेतल्यास निवडणुकीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. माजी अध्यक्ष केरबा भाऊ पाटील यांनी चौदा वर्ष सत्ता उपभोगली तर ए. डी. चौगले यांनी नऊ वर्ष सत्ता उपभोगली त्यावेळी त्यांच्या घरावर किती वेळा मोर्चे काढले. संचालक मंडळाचे अधिकार काढून घेतल्यानंतर रागापोटी संचालक मंडळाने चेंज रिपोर्ट सादर करून संचालक मंडळ पुन्हा स्थापन केले. सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी संचालक मंडळातील कोणालाच राजीनामे द्या असा आदेश दिलेला नाही. २५ सप्टेंबर रोजी न्यायालयाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे राजीनामे देण्याचा प्रश्नच येत नाही. पत्रकार परिषदेस संचालक गोविंद चौगले, बंडोपंत वाडकर, समरसिंह पवार-पाटील, विलास पाटील उपस्थित होते.