राधानगरी पोलीसांनी सात लाखांचा मूद्देमाल हस्तगत करत दोन अट्टल घरफोड्यांना अटक
सुपर न्यूज नेटवर्क
राधानगरी : शेटकेवाडी (ता. राधानगरी) येथे गेल्या आठवड्यात सचिन पांडुरंग वागवेकर यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावत राधानगरी पोलीसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक केली. सहा लाख पन्नास हजार रुपये रक्कमेचे सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेली होती.
राधानगरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या घरात चोरी झाल्याने पोलीसा समोर आव्हान निर्माण झाले होते. या चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश घेरडीकर यांनी केला. सायबर पोलिसांच्या मदतीने चोरीस गेलेला मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी करून या चोरीतील मुख्य संशयित आरोपी विनायक गजानन कुंभार (वय २७) रा. टाकवडे वेस इचलकरंजी ता. हातकणंगले याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांने किरण सुभाष पाटील (वय ३३) रा. राणाप्रताप चौक टाकवडे वेस इचलकरंजी यांच्या मदतीने केली असल्याचे कबूल केले.
यातील संशयित आरोपी विनायक कूंभार हा अट्टल घरफोडी करणारा गून्हेगार असून त्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
या चोरीचा तपास पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश घेरडीकर, खंङू गायकवाड, कृष्णात खामकर, कृष्णात यादव, किरण पाटील, दिगंबर बसरकर, रघूनाथ पवार यांनी केला.
९ दिवसांची पोलिस कोठडी
राधानगरी पोलीसांनी दोन्ही आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी घेत केलेल्या चौकशीत दोन लाख वीस हजार किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचा राणी हार, एक लाख सदतीस हजार ५०० रूपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे काळे मनी असलेले मंगळसूत्र, ब्याएशी हजार ५०० रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, सहा हजार किंमतीचे लहान मूलांचे चांदीचे दागिने, बासष्ठ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, त्रेप्पन्न हजार रूपये किंमतीच्या तीन अंगठ्या असा एकूण सहा लाख अष्ठाहत्तर हजार ७५० रूपये किंमतीचा मूद्देमाल हस्तगत केला.