
येळवडे : अंबाबाईची यात्रा सोमवारी
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : येळवडे (ता. राधानगरी) येथील ग्रामदैवत अंबाबाई देवीची यात्रा उद्या सोमवारी (ता. ८ ) होत आहे. मंगळवारी पहाटे अभिषेक व गुढ्या उभारून नव्या वर्षाचे स्वागत आणि सायंकाळी पाच वाजता गुढीपाडव्याच्या वाचनाने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती गावकमिटीने दिली.
अंबाबाई देवीची यात्रा प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असते. मराठी वर्षाची सांगता सणाने साजरी करण्याची या गावाची परंपरा आहे. सोमवार यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी लवकर देवीस अभिषेक घेतल्यानंतर मानाचे दंडवत व मानकऱ्यांच्या सजवलेल्या सासनकाठ्यांची पारंपारीक पी… ढबाक च्या साथीने मिरवणूक होईल. त्यानंतर याच सासनकाट्यांची एकत्रित मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरू होईल. यावर्षी मिरवणूकीला साउंड सिस्टीम वर बंदी केल्याने बेंजो, बँड सह विजापूर कडील वेगवेगळ्या रुपातील पारंपारिक सोंगाचे पथक आकर्षण ठरणार आहे. रात्री मांड जागवण्यासाठी एकाच वेळी दोन लोकनाट्य तमाशे आयोजित करण्याची येथे परंपरा आहे.